सदा सर्वदा योग तूझा घडावा - Sada Sarvada Yog Tuza Ghadava - गणपति प्रार्थना | Marathi Shloka With Lyrics
सदा सर्वदा योग तूझा घडावा - Sada Sarvada Yog Tuza Ghadava - गणपति प्रार्थना | Marathi Shloka With Lyrics |
SONG DETAILS:
Song: Song: सदा सर्वदा योग तूझा घडावा - Sada Sarvada Yog Tuza Ghadava - गणपति प्रार्थना
सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आतां ।।१।।
जय जय रघुवीर समर्थ।।
उपासनेला दृढ चालवावें
भूदेव संताशी सदा नेमावें
सत्कर्म योगे वय घालवावें
सर्वामुखी मंगल बोलवावें ।।२।।
कैलास राणा शिव चंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी ।।३।।
मोरया मोरया मी बाळ तान्हें
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा ब तू घाल पोटी ।।४।।
ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे
त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी
तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ।।५।।
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र
तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ।।६।।
जय जय रघुवीर समर्थ।।
अर्धा लाडू चंद्रावर | गणपति बाप्पा उंन्द्रावर ||
१ - २ - ३ - ४ गणपतिचा जय जय कार |
कृपया “Subscribe” & click “Follow” my HindiLyricsTadka.com website और
अपने विचार और सुझाव निचे दिए गए “Comment Box” मैंने जरुर लिखे|
No comments:
Post a Comment
Please do not add any spam link in the comment box